ग्रामपंचायत वेवजी हद्दीत एकूण ३ महसूल गावे असून एकूण १३ पाडे आहे. ग्रामपंचायत वेवजी हद्दीत एकूण १०४२३ लोकसंख्या आहे. वेवजी गाव हे १००% आदिवासी समाजापैकी असून ग्रामपंचायत वेवजीच्या तिन्ही बाजूने डोंगर असून ते एक वेवजी गावाला पर्यावरणाच्या दृष्टीने नैसर्गिक सौदर्य व नैसर्गिक साधन संपत्तीच्या नैसर्गिक वरदान प्राप्त झाले आहे. तसेच बारड डोंगर हा आदिवासी देवस्थान लाभलेला असून दरवर्षी पितृ बारस रोजी औषधी वनस्पती चमकतात ते बघण्यासाठी व औषधी वनस्पती साठी तेथे लोक येतात. सदर वेवजी गाव हे गुजरात राज्यच्या सीमेवर असून तेथील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती,शिंदीच्या झाडापासून ताडी उत्पादन, चिकू,केळी,नारळ हे प्रमुख व्यवसाय असून तेथील लोक हे नजदीक उंबरगाव येथे जी.आय.डी.सी. मध्ये नोकरी करतात. वेवजी गावात प्रमुख पिक हे भात असून वेवजी गावाची लोकांची वागणूक चांगली असून वेवजी गाव हे चांगले प्रगतीत असून दळणवळणाची सोई सुविधा बऱ्याच पैकी झालेली आहे.
तसेच वेवजी ग्रामपंचायतीला ISO प्रमाणपत्र प्राप्त झाले असून वेवजी गाव हे पेसा गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे. ग्रामपंचायत वेवजी हद्दीत अंदाजे ६०% साक्षरता प्रमाण असून ते १००% करण्यासाठी विविध कार्यक्रम करण्यात येत आहे. उदा. सर्व जि.प.शाळा ई-डिजिटल करणे, कुपोषण निर्मुलन करणे,शिक्षणासाठी जनजागृती करणे, शिक्षणाचे महत्व, शिक्षणाचे फायदे समजउन सांगणे. अश्या प्रकारे विविध कार्यक्रम करत असून त्याचा चांगला परिणाम दिसून येत असून मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होतआहे.